‘ती’ लोकल मोटरमन नाहीतर गार्ड चालवत होता ?

December 8, 2015 8:43 PM0 commentsViews:

local accident08 डिसेंबर : मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर धडक दिलेली लोकल मोटरमन नाही तर गार्ड चालवत होता अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिलीये.

काल सोमवारी मध्यरात्री सीएसटी रेल्वे स्टेशनच्या बफर एंडला लोकल धडकली होती. धडक दिलेली लोकल मोटरमन चालवत नव्हता, तर गार्ड चालवत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येतीये. सीएसटी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर रात्री वाजता रिकामी लोकल धडकली. पण आपण ही लोकल चालवत नव्हतो असं स्पष्टीकरण मोटरमननंच लेखी दिलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दुखापत झाल्यामुळे गार्डला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या घटनेची रेल्वेमंत्र्यांनीही दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ती लोकल गार्ड चालवत असल्याची माहिती मिळतेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close