संजय दत्तच्या सुटकेचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती ?

December 8, 2015 9:41 PM0 commentsViews:

sanjay dutt3408 डिसेंबर : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तच्या कायमच्या सुटकेची चर्चा सुरू आहे. पण, संजय दत्तला शिक्षेतून सुटका देण्याचे सर्वाधिकार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याची माहिती मिळतेय. तर गृहविभाग मात्र सूट देण्याबाबत सकारात्मक नसल्याचं समजतंय.

संजय दत्तच्या सुटके संदर्भातली फाईल आता मुखमंत्र्यांकडे आहे. यावर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेऊ शकता. जेलमध्ये चांगल्या वागणुकीमुळे संजयच्या शिक्षेत कपात होण्याची शक्यता आहे. जेलमध्ये एखाद्या कैद्याचं वर्तन चांगलं असल्यास त्यांच्या शिक्षेत कपात होते. याचा नियम संजयलाही लागू होतोय पण याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यामुळे मुख्यमंत्री संजयची सुटका करता का हे पाहण्याचं ठरेल.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close