नवी मुंबई स्मार्ट सिटी नको !, सत्ताधारी राष्ट्रवादीचाच विरोध

December 9, 2015 8:01 AM0 commentsViews:

Navi Mumbai09 डिसेंबर : देशात स्मार्टसिटी म्हणून तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात स्मार्ट शहर म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेत प्रयत्न करतेय. माञ ही स्मार्ट सिटी आम्हाला नको अशी भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.

तर विरोधकांनी स्मार्टसिटी हवीय. स्मार्ट सिटीला विरोध करत सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. स्मार्टसिटीच्या माध्यमातून मिळणार्‍या निधीवर अंकुश ठेवण्यासाठी नियमावलीत विशेष हेतू यंञणा नेमण्यात आलीये.

ही यंञणा आपल्या अधिकारावर टाच आणेल. यासाठी सत्ताधार्‍यांचा स्मार्टसिटीला विरोध करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष सेना भाजपने केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close