पुणे सुधारगृहातून 38 महिलांचं पलायन

December 9, 2015 12:06 PM0 commentsViews:

pune sudargraha09 डिसेंबर : पुण्यातील वानवडी येथील महिला सुधारगृहातील तब्बल 38 महिला सुधारगृहातून पळून गेल्याची घटना घडलीये. मात्र, त्यातील 10 महिलांना पकडण्यात आले. इतर महिलांचा शोध सुरू आहे. या सर्व महिला पिटा ऍक्ट या कलमाखाली अटक करण्यात आलेल्या होत्या.

महिला सुधारगृहात चांगले जेवण मिळत नव्हते, नातेवाईकांशी फोनवर बोलू देत नव्हते, अशा स्वरूपाच्या तक्रारी महिला करीत होत्या. त्यामुळेच त्यांनी रात्री 9 च्या सुमारास महिलासुधारगृहाची तोडफोड करुन या सर्व महिला पळुन गेल्या. पळुन गेलेल्या महिलांपैकी 18 महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र अद्यापदेखील 21 महिला फरार झाल्या आहेत. यामध्ये बांग्लादेशी महिलांचा समावेश आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close