स्मार्ट सिटी ही फसवी योजना, राज ठाकरेंचा विरोध

December 9, 2015 1:15 PM0 commentsViews:

raj thackaey pc09 डिसेंबर : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र विरोध केलाय. ही निव्वळ फसवी योजना असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. शहर नियोजनात केंद्र सरकारने विनाकारण ढवळाढवळ करण्याची काहीच गरज नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटीला विरोध केला. मुळात स्मार्ट सिटी योजना ही फसवी आहे. एखाद्या शहराचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी 100 कोटी देणार आहे. राज्य सरकार 50 कोटी टाकणार आणि महापालिकाही खर्च उचलणार आहे. म्हणजे केंद्र सरकार 5 वर्षांसाठी 500 कोटी देणार आहे. एखाद्या मोठ्या शहरांचा 100 कोटींत विकास तरी होणार का ? असा सवाल राज यांनी उपस्थित करत महापालिका या स्वायत्ता संस्था आहे. महापालिकेनं विकासाची योजना तयार करावी आणि ती राज्य सरकारकडे सादर करावी आणि राज्य सरकारने केंद्राकडून त्यासाठी पैसा घ्यावा. उगाच केंद्राने यात ढवळाढवळ करू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली. तसंच स्मार्ट सिटी योजना ही राजकीय दृष्ट्या श्रेय लाटण्यासाठी आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला. आमचा स्मार्टसिटीला विरोध आहे. काही सुचना आहे त्या आम्ही वेळेवर केंद्र अथवा राज्य सरकारला सुचवू असंही राज ठाकरे म्हणाले.

अणेंचा बोलविता धणी कोण ?

वेगळ्या विदर्भाला आमचा पहिल्यापासून विरोध होता आणि तो आहे. आणि आता श्रीहरी अणेंना यावर बोलण्याची काय आवश्यकता होती. हा विषय त्यांच्या अधिकाराखाली तरी येतो का ? हे पाहणेही महत्वाचं आहे. मुळात अणेंचा बोलविता धनी कोण याचा शोध घेण्याची गरज आहे अशी मागणी राज ठाकरेंनी केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close