नागपूर अधिवेशनात रणकंदन सुरूच, आजचा दिवसही वाया

December 9, 2015 1:57 PM0 commentsViews:

nagpur vidhanbhavan09 डिसेंबर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वाया गेलाय. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सलग दुसर्‍या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज ठप्प झालंय.

संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं आजही विधानभवनात निदर्शनं केली. खडसेंनी विरोधकांना कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन केलंय.

पण विरोधक संपूर्ण कर्जमाफीवर ठाम आहेत. त्यामुळे आजचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी सरकारविरोधात आघाडी उघडलीये. शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेसने काल महामोर्चाही काढला होता.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close