कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शालूचा लिलाव तुर्तास स्थगित

December 9, 2015 2:11 PM0 commentsViews:

kolhapur mahalaxmi409 डिसेंबर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या शालूचा लिलाव स्थगित करण्यात आला. शालूच्या लिलावसाठी कुणीच बोली लावली नसल्यामुळे हा लिलाव तुर्तास स्थगित करण्यात आला.

2008 सालापासून देवीच्या शालूचा लिलाव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केला जातो. दरवर्षी तिरुपती बालाजीकडून देवीला मातृभावनेतून हा शालू दिला जातो. आणि त्यानंतर दसर्‍यादिवशी हा शालू देवीला नेसवला जातो. त्यानंतर देवस्थान समिती या शालूचा
लिलाव करते.

यंदाही देवस्थान समितीने या शालूची मूळ किंमत 5 लाख 42 हजार ठरवली आणि त्यावर बोली लावण्याचं आवाहन केलं. पण 9 लिलाव धारकांनी ही रक्कम जास्त असल्यामुळे बोलीच लावली नाही. परिणामी या शालूचा लिलाव स्थगित करण्यात आला. गेल्या वर्षी या शालूचा लिलाव 5 लाख 55 हजारला झाला होता. पण यंदा हा लिलाव तहकूब झाल्यामुळे आता लवकरच पुन्हा नव्यानं या शालूचा लिलाव करण्यात येणार आहे.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close