बिनीता गदानीचा मृत्यू

February 15, 2010 9:57 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारीपुण्यातील बॉम्बस्फोटामध्ये मुंबईतील बिनीता गदानी या तरुणीचा बळी गेला आहे. बिनीता कांदिवलीतील गोखले रोडवर राहत होती. ती पुण्यात नोकरी करत होती.आज पहाटे 4 वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.बिनीता तिच्या मित्रमैत्रीणींसोबत पार्टीसाठी जर्मन बेकरीत गेली होती. स्फोटके असलेली बॅग जिथे ठेवली होती त्याच्या बाजूलाच बिनिताचा ग्रुप पार्टीसाठी बसला होता. तिच्या वडिलांनी टीव्हीवरची स्फोटाची बातमी पाहून चौकशीसाठी तिला फोन केला. तेव्हा तिचा फोन लागत नव्हता. परंतू नंतर तिला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलिसांनी कळवली आणि गदानी कुटुंबाला धक्का बसला.

close