मुंबई विमानतळावरुन लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

December 9, 2015 9:24 PM0 commentsViews:

Terror attack131

09 डिसेंबर : मुंबईत लष्कर ए तोयबाच्या दहशवाद्याला अटक करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून एनआयएने मुंबई विमानतळावरून असादुल्लाह खान या दहशतवाद्याला अटक केली आहे.

असादुल्लाह लष्कर-ए-तोयबा या दहशवादी संघटनेसाठी काम करतो, अशी सूत्रांची माहिती मिळाल्यानंतर एनआयएच्या पथकाने ही कारवाई केली आहे. असादुल्लाहला उद्या (गुरूवारी) एनआयए स्पेशल कोर्टात हजर करणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close