भारत सहिष्णु देश आहे, असहिष्णुता नाहीच – नाना पाटेकर

December 9, 2015 9:49 PM0 commentsViews:

nana-patekar-759

09 डिसेंबर : भारत हा देश कायमच सहिष्णू आहे. ज्या व्यक्तींना या देशामध्ये असहिष्णुता वाढली आहे असं वाटतं, त्यांनी ती दूर करण्याचा प्रयत्न करावा. देश सोडण्याच्या विचाराने असहिष्णुता संपेल का?, असा सवाल नानांनी केला आहे. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकरांनी असहिष्णुतेच्या वादावर आपली परखड भूमिका व्यक्त केली आहे.

देश हा सहिष्णू असो व असहिष्णू तो माझा आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजायला हवी. जन-गण-मन हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत जगातील सर्वांत सुंदर गाणे आहे. देशातील असहिष्णुतेच्या मुद्यांवर देश सोडायचा विचार मनात येतोच कसा, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला भारतात राहणे असुरक्षित वाटत नाही, असे जर इतरांना काही त्रुटी दिसत असतील तर त्यांनी त्या दूर करण्यासाठी पुढे यावं, असंही नानाने सुचवलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close