‘बाजीराव-मस्तानी’च्या अडचणीत वाढ, भंसाळींच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा

December 10, 2015 9:13 AM0 commentsViews:

bhansali410 डिसेंबर : ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमासमोरच्या अडचणी काही केल्या संपत नाहीयेत. या सिनेमाभोवती सध्या अनेक वाद सुरू आहेत. त्यात अजून एका वादाची भर पडलीये.

झालंय असं की, बाजीराव पेशव्यांचे वंशज तमकिल अली यांनी दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केलाय.

महत्त्वाची बाब म्हणजे या खटल्यात त्यांनी सेन्सॉर बोर्डालाही या मानहानीसाठी जबाबदार धरलंय. याआधीही पिंगा आणि मल्हारी गाण्यावर आक्षेप घेत पेशव्यांच्या वंशजांनी गाण्यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close