सलमानला दिलासा की शिक्षा कायम ?,आज फैसला

December 10, 2015 9:29 AM0 commentsViews:

salmankhan10 डिसेंबर : फुटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खानसाठी आजचा दिवस निर्णायक आहे. या प्रकरणाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आलाय. या प्रकरणी आज सलमान खानला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

2002 साली सलमानने बेफाम गाडी चालवत एका जणाला चिरडलं होतं. तर 4 जण जखमी झाले होते. गेली 13 वर्ष या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. सत्र न्यायालयाने सलमानला या प्रकरणात दोषी धरत 5 वर्षांची शिक्षा सुनावलीये. पण, हायकोर्टात सलमान धाव घेतली. हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेवर स्थगिती दिलीये. आज या प्रकरणाचा अंतरीम फैसला होणार आहे. काल बुधवारी या खटल्यातला सर्वात महत्वाचा आणि एकमेव साक्षीदार कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांनं दिलेली साक्ष विश्वासार्ह नाही, असं हायकोर्टाने सांगितलंय. जर हायकोर्टाने रवींद्र पाटील यांची साक्ष फेटाळली तर सलमान खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ज्यावेळी अपघात घडला तेव्हा रवींद्र पाटील हा गाडीतच होता. त्यानेच बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली होती. आता पाटील यांची साक्ष नाकारल्यामुळे सलमानची कायमची सुटका होते की शिक्षा कायम राहते हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close