रमेश कदमांचा प्रताप, तब्बल 59 गाड्या धूळ खात !

December 10, 2015 11:19 AM0 commentsViews:

ramesh kadam_scam10 डिसेंबर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या गैरव्यवहारामुळे आमदार रमेश कदम यांना जेलची हवा खावी लागली. पण, रमेश कदम यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय.

शेतकर्‍यांनी उत्पादन केलेला माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी ‘ताजी भाजी तुमच्या दारी’ ही योजना सुरू केली होती. त्यासाठी शेतातील ताज्या भाज्या तात्काळ ग्राहकांना विकण्यासाठी 59 गाड्या खरेदी केल्या होत्या. या खरेदी केलेल्या गाड्या लाभाथीर्ंना देण्यासाठी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सरकारने आदेशही काढले. पण हे आदेश फक्त कागदावरच राहिलेत. प्रत्यक्षात या गाड्या आजही ठाणे शहरात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे या कोट्यवधीच्या गाड्यांचं पुढे होणार काय हा प्रश्न उपस्थित झालाय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close