बजरंग दलाकडून निषेध

February 15, 2010 10:13 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारीपुण्यातील बाँम्बस्फोटाचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. नागपूरमध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या वतीने गोळीबार चौक इथे निषेध सभा घेण्यात आली. या वेळी दहशतवादी विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.दहशतवादाला पाकिस्तानातूनच खत पाणी मिळत असल्याने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागपूरच्या महापौर अर्चना डेहनकर आणि अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

close