कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

December 10, 2015 11:56 AM0 commentsViews:

koyana dam10 डिसेंबर : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ही 2.90 रिश्टर स्केल इतकी होती.

कोयना धरणापासून 12 किलोमीटर अंतरावर गोशेटवाडी हे भूकंपाचे केंद्रस्थान आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांनी घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आधीही याच परिसरात भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close