आयपीएलसमोर सुरक्षेचा प्रश्न

February 15, 2010 10:43 AM0 commentsViews: 5

15 फेब्रुवारीपुण्यातील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलसमोर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरेक्षिविषयी शंका उपस्थित केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सुरक्षा सल्लागार रेज डिकासन यांना पुण्यातील स्फोटाची चौकशी करण्याचे सांगण्यात आले आहे. या आठवड्याच्या शेवटी ते क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंना भारतातील सुरक्षा व्यवस्थेविषयी माहिती देतील. अर्थात आयपीएलमध्ये खेळाडू देशाकडून खेळत नाहीत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंना आयपीएल खेळायला मनाई करु शकत नाही. आणि आयपीएलमध्ये खेळायचं की नाही, याचा निर्णय खेळाडूंनी घ्यायचा आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये क़ॉमनवेल्थ स्पर्धाही भारतात होणार आहेत. आणि पुणे स्फोटानंतर कॉमनवेल्थ फेडरेशननेही भारतातल्या सुरक्षेविषयी शंका व्यक्त केली आहे.

close