शरद पवारांच्या अमृतमहोत्सवाला दिग्गज नेत्यांची मांदियाळी

December 10, 2015 6:12 PM0 commentsViews:

Sharad apwar3q31

10 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत अमृतमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली आहे.

शरद पवार हे भारतीय राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्व मानले जातात. सर्वच पक्षात पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. पवार यांचा अमृतमहोत्सव सुरू असून, त्यानिमित्ताने पवारांच्या बेरजेच्या राजकारणाची आज प्रचीती आली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, आरजेडी पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योजक अनिल अंबानी आणि अन्य मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.

यावेळी शरद पवार यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ऑन माय टर्म्स हे इंग्रजी पुस्तक आणि लोक माझे सांगाती हे मराठी आत्मकथन आणि गौरवग्रंथाचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांनी शरद पवारांबद्दल लेख लिहिले आहेत. उद्योगक्षेत्रातही अनिल अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा, राहुल बजाज यांचेही लेख आहेत. त्याबरोबरच सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, पंडित उल्हास कशाळकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनीही शरद पवारांबद्दल लेख लिहिले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close