दुष्काळाच्या बैठकीवर बहिष्कार

February 15, 2010 10:56 AM0 commentsViews:

15 फेब्रुवारीराज्यातील दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलवली होती. पण मुख्य समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत या बैठकीवर युतीने बहिष्कार टाकला. त्यामुळे फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच नेते या बैठकीला उपस्थित होते. सरकार सध्या राज्यातील मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे, आणि इतर अनावश्यक मुद्द्यांकडेच लक्ष देत आहे, असा आरोप युतीच्या खासदारांनी केला आहे. दुसरीकडे राज्यातील सुरक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण झाल्याचा आरोप शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी केला आहे. म्हणूनच आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर युतीचे खासदार बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.

close