सलमानच्या सुटकेनंतर ‘भाईजान्झ’ची दावत

December 10, 2015 7:58 PM0 commentsViews:

 

10 डिसेंबर : हॉटेलमध्ये या, पोटभर जेवा आणि तुमच्या इच्छेनुसार बिल द्या, अशी ऑफर जर तुम्हाला कोणी दिली तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही… पण वांद्र्यातील ‘भाईजान्झ’ या रेस्टॉरंटने आज सलमानची निर्दोष मुक्तता झाल्याचा जल्लोष करत, सर्व ग्राहकांना मेक युवर ओन बील, अशी ऑफर दिली आहे.

सलमान खानच्या पाच चाहत्यांनी वांद्र्यात ‘भाईजान्झ’ नावाचं एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे. वांद्र्यातील कार्टर रोडवर हे रेस्टॉरंट आहे. फुटपाथ अपघात प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. याच निमित्ताने मुंबईतील ‘भाईजान्झ’ रेस्टॉरंटने सलमानच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मुंबईकरांना दावतचं दिली आहे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close