सूत्रधार सीमेपलिकडचे

February 15, 2010 11:09 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारीपुणे बॉम्ब स्फोटामागचे सूत्रधार सीमेपलिकडचे केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी म्हटले आहे. पुणे बॉम्बस्फोटामध्ये स्थानिक लोकांचा हात असला तरी याचे सूत्रधार सीमपलीकडे आहेत, असेही ते म्हणाले आहेत.सुगावा सापडला दरम्यान पुणे बॉम्बस्फोटाच्या तपासाला दिशा देणारा सुगावा सापडला आहे. जर्मन बेकरीच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित दिसत आहेत. हे दोघेजण बॉम्बस्फोटाच्या वेळी रिक्षातून जात असल्याचे त्यात दिसत आहे.बेकरीसमोर असलेल्या 'ओ' या फाईव्हस्टार हॉटेलसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. याच कॅमे-यांनी या दोन संशयितांना टिपले आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम आता पोलीस करत आहेत.स्फोटाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येणार आहे.

close