8 पारध्यांची जाळून हत्या

February 15, 2010 11:16 AM0 commentsViews: 2

15 फेब्रुवारी सोलापूर जिल्ह्यातील माढा इथे 8 पारध्यांची जाळून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये 6 मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. घरे पेटवून दिल्याने हे मृत्यू झाल्याची तक्रार पारध्यांनी केली आहे. आतापर्यंत झुमरबाई नावाच्या महिलेसह एकूण 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिलादेखील पारधी समाजाचीच आहे. अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे. माढा गावापासून 4 किलोमीटरावर असलेल्या धेंडे वस्तीत हा प्रकार घडला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

close