ठाण्यात अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, बाळाचा मृत्यू

December 11, 2015 9:17 AM0 commentsViews:

thane blast11 डिसेंबर : ठाण्यात एका अॅम्ब्युलन्समधल्या ऑक्सिजनच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडलीये. तर डॉक्टर आणि नर्स किरकोळ जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांची तावदानंसुद्धा फुटली. तसंच दुसर्‍या अॅम्ब्युलन्सही पेट घेतला.

भिवंडीमधल्या काल्हेरमध्ये राहणार्‍या मनीष जैन यांचं एका दिवसाचं बाळ आजारी होतं. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे
ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरात असणार्‍या वेदांत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होतं. त्यानंतर त्याला मुंबईच्या सूर्या नर्सिंग होममध्ये नेण्यात येणार होतं. पण, अॅम्ब्युलन्समधल्या ऑक्सिजन सिलेंडरनं पेट घेतला. डॉक्टर भवनदीप गर्ग आणि परिचारिका लीला चाको हे किरकोळ जखमी झाले या घटनेनंतर या दोघांनी गाडीतून पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला त्यांच्यावर ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एक दिवसाच्या बाळाची आई कीर्ती जैन हिच्यावर भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अखेर ठाणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर देखील या ठिकाणी लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तर या प्रकारामुळे रुग्णाचे नातेवाईक देखील भयभीत झाले आहेत.

वर्तक नगर परिसरातील लागलेल्या आगीमुळे दोन्ही अॅम्ब्युलन्स जळून खाक झाल्या आहेत. या ठिकाणी ठाणे पोलिसांनी पाहणी केली त्या नंतर अशी घटना भविष्यात होऊ नये या करिता ऍम्बुलन्स चालकांनी देखील कुठे तरी खबरदारी घ्यावी असं आवाहन ठाणे पोलिसांनी केलं आहे. सदरच्या घटनेनंतर इतर काही कारण समोर येतंय का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close