केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा, निर्यात मूल्य 700 डॉलर्सवरुन 400 वर

December 11, 2015 11:29 AM0 commentsViews:

onion3452311 डिसेंबर : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना केंद्र सरकारनं तात्पुरता दिलासा दिला आहे. कांद्याचं किमान निर्यात मूल्य सरकारनं 700 डॉलर्सवरुन 400 डॉलर्सवर आणलं आहे. यामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कांद्याचं निर्यात मूल्य कमी करा, ही मागणी गेले अनेक महिने होत आहे.

मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये तब्बल 25 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. लिलाव सुरू होताच एका क्विंटलमागे 300 रुपयांनी भाव कोसळले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. एका आठवड्यात कांदा 2500 रुपयावरून 1000 हजार रुपयावर आल्यामुळे शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी अगोदर लिलाव बंद पडला त्यांनतर विंचूर चौफुलीवर धाव घेऊन रस्ता रोको करून कांद्याला हमी भाव देण्याबरोबरच निर्यातमुल्य तातडीने कमी करण्याची मागणी केली. सरकारचे चुकीचे धोरण आणि व्यापार्‍यांची चालाकी याचा फटका आम्हाला बसतो असं शेतकर्‍यांचं म्हणणं होतं. या प्रकरणी कालच शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close