तपास ढिम्म, आयुक्त खुशाल!

February 15, 2010 12:24 PM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारीदेश हादरवणा-या पुणे बॉम्बस्फोटाला 48 तास पूर्ण होत आले. पण पोलिसांच्या हाती अजून कोणतीही माहिती लागलेली नाही. आज फॉरेन्सिक रिपोर्ट मिळेल असे सांगण्यात येत होते. पण तोही अजून मिळालेला नाही. तपासाबाबतची माहिती देण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली. पण संतापाची बाब म्हणजे पोलीस आयुक्त तपासाबाबत अजिबातही गंभीर नव्हते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. एवढ्या गंभीर विषयावर माहिती देताना आयुक्त आरामात मोबाईलवर बोलत होते.आत्तापर्यंत बॉम्बस्फोटातील 7 जणांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. तर अजून 38 जण उपचार घेत आहेत. एवढीच माहिती आयुक्तांनी या पत्रकार परिषदेत दिली. तपासाबाबत मात्र त्यांनी काहीही माहिती दिली नाही.आयुक्तांच्या या वागण्याने चिडलेल्या पत्रकारांनी त्यांना धारेवर धरले. तरीही ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. नंतर पत्रकारांचा वाढता संताप पाहून त्यांनी मवाळ भाषा सुरू केली. पण तरीही त्यांची देहबोली गंभीर होत नव्हती. त्यामुळे अखेर बॉम्बस्फोटाच्या तपासाबाबत नेमकी माहिती मीडियाला काही मिळू शकली नाही.

close