श्वास रोखून धरा,’बाहुबली 3′ ही येणार !

December 11, 2015 12:26 PM0 commentsViews:

bahubali prabhu11 डिसेंबर : बाहुबली, कटप्पा, भल्लादेव, देवसेना आणि कालकेया या कथानकांनी नटलेला बाहुबली सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली. त्यातल्या त्यात कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? हा प्रश्न देशपातळीवर भेडसावला गेला आणि याबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. आता या प्रश्नाचा खुलासा ‘बाहुबली 2′ मधून लवकरच होणार आहे. पण बाहुबलीप्रेमींना आणखी एक खुशखबर म्हणजे ‘बाहुबली 3′ ही तुमच्या भेटीला येणार आहे.

‘कट्टपाने बाहुबलीला का मारलं ?’ ह्याची उत्सुक्ता सगळ्यांनाच लागली असून ‘बाहुबली 2′ हा पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या ‘बाहुबली’ सिनेमाचा दुसरा भाग ‘बाहुबली 2’चं शूट एकदम जोरात सुरू आहे. या सिनेमामध्ये तुम्हाला बाहुबलीची प्रेम कथा आणि त्याच राज्य बघायला मिळेल. तुमच्यासाठी आणखीन एक खुशखबर अशी की, ‘बाहुबली 3′ देखील तुमच्या भेटीला येणार आहे. पण ही दुसर्‍या भागाची कथा नसून एक संपूर्ण नवीन सिनेमा असणार आहे. राजमौली म्हणतात की, या सिनेमाचा तिसरा भाग देखील ते बनवणार आहे. पण ‘बाहुबली 3′ हा दुसर्‍या भागाची कथा पुढे नेणार नसून एक संपूर्ण नवीन सिनेमा असेल. याची कथा पूर्णपणे नवीन असेल असंही राजमौलींनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close