मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटीला टोलमाफी नाहीच !

December 11, 2015 12:56 PM0 commentsViews:

ST_Bus.image11 डिसेंबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटीला टोलमाफी देण्याबाबत राज्य सरकारने नकार दिलाय. करारनाम्यात एसटीला टोलमाफी बाबत कोणतीही तरतूद नाही. यामुळे एसटीला टोलमाफी मिळणार नाही.

शासनाचे पथकर धोरण व प्रकल्पाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अति. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलीय. या समितीच्या अहवालातील शिफारशीस अनुसरून राहूनच एसटी आणि छोट्या वाहनांना टोल माफी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती विधानसभेत लेखी उत्तरात एकनाथ शिंदे यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close