चंद्रपूरमध्ये दीड हजार गावे कोरडी

February 15, 2010 2:37 PM0 commentsViews: 37

15 फेब्रुवारीचंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 400 गावांना उन्हाळ्यापूर्वीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावक-यांना मैलोन मैल पायपीट करावी लागत आहे. तर शेतीला पाणी नसल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मोरवाही गावाला फटकाउदाहरण द्यायचे झाले तर चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवाही गावाला मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाजवळची उमा नदी आणि भास्बोडा तलाव आटला आहे. पहिले पीक वाऴून गेले…दुबार पेरणीचे कर्ज माथ्यावर बसले…अशी परिस्थिती ओढवल्याने येथील शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दीड हजार गावे टंचाईग्रस्तमोरवाही गावासोबतच जिल्हातील एकूण 1 हजार 402 गावांतही पाण्याचा भीषण टंचाई जाणवत आहे. मूल तालुक्यातील 111 गावांपैकी 50 गावांत दुष्काळ पडला आहे. निम्म्या गावांची अंतिम टक्केवारी 50 टक्क्यांच्या आत आहे.सरकारने जाहीर केलेले अनुदानही या शेतकर्‍यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.

close