टी-20 वर्ल्ड कप : 19 मार्चला रंगणार भारत पाकिस्तान मुकाबला

December 11, 2015 5:48 PM0 commentsViews:

T-2014

11 डिसेंबर : पुढील वर्षी भारतात होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक आज (शुक्रवारी) मुंबईमध्ये जाहीर करण्यात आलं असून पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ 19 मार्च रोजी धरमशाला इथे आमने सामने उतरतील.

भारतात 8 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान टी-20 विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचा पहिला सामना नागपूरमध्ये 15 मार्च रोजी होणार आहे तर दुसर्‍या सामन्यात भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असेल. धरमशालामध्ये 19 मार्च रोजी हा सामना खेळवण्यात येईल.

भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ एकाच गटात आहेत. तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दुसर्‍या गटात आहेत. बंगळुरु, चेन्नई, धरमशाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, नागपूर आणि नवी दिल्ली या आठ ठिकाणी वर्ल्ड कपच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचे सामने दिल्ली आणि मुंबईत अनुक्रमे 30 आणि 31 मार्चला होणार आहेत. तर कोलकाताच्या ईडन गार्डनवर 3 एप्रिल रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close