योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक हवालदिल

December 11, 2015 6:18 PM0 commentsViews:

प्रशांत बाग, जळगाव
11 डिसेंबर : खान्देशातले केळी उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत. केळीला अजूनही सरकार फळाचा दर्जा द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे हे सुद्धा केळी बागायतदार आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पीक विमा योजना निकषात बदल करण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकर्‍याला दिलासा मिळेल असं चिन्हं दिसत असली तरी, हे कधी होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Banana PKG

तापी नदीच्या काठाला लागून दिसणार्‍या या केळीच्या हिरव्यागार बागा… देशात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन करणारा हा जिल्हा… पण याच केळी उत्पादकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कारण एकीकडे अस्मानी संकटानं पीक उद्धवस्त होतंय. तर दुसरीकडे आश्वासनाच्या सुलतानी संकटात शेतकरी सापडलाय.

केळीला हमीभाव मिळावा, निदान उत्पादन खर्चावर आधारित नुकसान भरपाई मिळावी या मागणीकरता शेतकरी आक्रमक झाले होते. चोपड्याजवळ शेतकर्‍यांनी केळी रस्त्यावर फेकून आंदोलन केलं.

या भागातल्या शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर त्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च गेला आहे. अनेकवेळा मागणी करुनही इथल्या शेतकर्‍याला केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळालं नाही. याचा निर्णय केंद्राच्या हाती असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका घेतं हे महत्वाचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close