1 कोटींचे बक्षीस

February 15, 2010 3:30 PM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारीपोलिसांकडून पुणे बॉम्बस्फोटाचा तपास सुरूच आहे. पण आता सरकारने ही जबाबदारी नाग रिकांवरही सोपवली आहे. पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट घडवणार्‍या अतिरेक्यांबद्दल माहिती देणार्‍याला सरकार 1 कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे. गृहविभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार बक्षिसासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. हल्लेखोरांबद्दल जो माहिती देईल त्याची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल. त्यासोबतच त्याचे नावही न विचारता त्याला बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. पण माहिती शंभर टक्के खरी हवी असेही त्यांनी सांगितले आहे. पुणे बॉम्बस्फोटासंदर्भात अद्यापही तपास यंत्रणांना सुगावा मिळालेला नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

close