शिवसेनेची शरद पवारांवर स्तुतीसुमनं आणि टीकाही

December 12, 2015 2:28 PM0 commentsViews:

PAWAR X UDDHAV12 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं सामनाच्या आजच्या अग्रलेखात शरद पवारांवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतानातच सामनातून टीकाही करण्यात आलीये.

शरद पवारांवर एकही टीकेची संधी न सोडणार्‍या शिवसेनेनं स्तुतीसुमनं उधळलीये. ‘सामना’च्या अग्रलेखात, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडणारी जी व्यक्तिमत्त्वे आज उरली आहेत. त्यात शरद पवारांचा उल्लेख करावा लागेल अशी स्तुतीसुमनं उधळलीये.

शरद पवार आता राजकीय निवृत्तीची भाषा करीत असतात, पण त्यावर कोणी विश्‍वास ठेवू नये. ते बुद्धिबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार याविषयी आमच्या मनात शंका नाही. निवृत्तीची भाषा हा चकवा आहे. त्यामुळे शरदरावांकडून शिकण्यासारखे खूप आहे. बारामतीसारखा मागास परिसर विकासाच्या दृष्टीने देशाच्या नकाशावर नेऊन ठेवला. जगभरातील नेत्यांचे पाय बारामतीस नेहमीच लागतात, पण संपूर्ण महाराष्ट्रास बारामतीचे भाग्य लाभले नाही हे सुद्धा तितकेच खरे असा टोला लगावलाय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close