शरद जोशी यांचा अल्पपरिचय (ग्राफिक्सच्या माध्यमातून)

December 12, 2015 2:59 PM0 commentsViews:

12 डिसेंबर :  आपलं संपूर्ण आयुष्य शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारलेले शरद जोशी हे झुंजार शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे…शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने आणि मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली.

शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची आणि तुरुंगाची भीती घालवली. “जोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही ” असं शरद जोशी म्हणायचे.. अशा या शेतकर्‍यांच्या योद्‌ध्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. तोपर्यंत त्यांचं पार्थिव पुना हॉस्पिटलच्या शीत गृहात ठेवल जाणार आहे.अमेरिकेतून त्यांचे नातेवाईक भारतात आल्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जातील.

शेतकर्‍यांचा योद्धा

शरद जोशी यांचा 3 सप्टेंबर 1935 रोजी सातार्‍यात जन्म झाला. नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी हे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी युनोमधील नोकरी सोडली आणि शेतकर्‍यांसाठी अख्ख आयुष्य वेचलं. शेतकर्‍यांविषयीची कळकळ, सहज सोप्या भाषेत संवाद साधण्याची हातोटी या यांच्या स्वभावामुळे त्यांनी शेतकर्‍यांच्या मनात आपलं वेगळं स्थान मिळवलं. ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा
देऊन त्यांनी समाजातील शेतकर्‍यांना जात, धर्म, भाषा याला भेद विसरायला शरद जोशी यांनी शिकवलं. हे त्यांचं सर्वात मोठं यश म्हटलं जातं. 1980 साली नाशिकमधील कांदा आणि ऊस दराप्रश्नी शरद जोशी शेतकरी संघटनेला घेऊन रस्त्यावर उतरले होते.

शरद जोशी यांच्या महत्त्वाच्या घोषणा
- भीक नको हवे घामाचे दाम
- शेतकरी तितका एक एक, शरद जोशी लाखात एक
- सरकारचे धोरण हे शेतकर्‍यांचे मरण

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close