स्फोटात आरडीएक्स; दोघे ताब्यात

February 16, 2010 9:19 AM0 commentsViews: 7

16 फेब्रुवारीपुणे येथे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट आणि पेट्रोलियम हायड्रोकार्बन ऑईल वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिन्हींच्या मिश्रणातून हा स्फोट घडवल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.संशयित ताब्यातबॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुणे आणि पिंपरीतील जनवाडी आणि कुदळवाडी इथून या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मृतांची संख्या 10बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आता 10 झाली आहे. स्फोटात जखमी झालेला अभिषेक रवी सक्सेना या 24 वर्षीय विद्यार्थ्याचा आज बुधराणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अभिषेक कोरेगाव पार्क इथे राहाणारा होता. डी. वाय. पाटील कॉलेजचा विद्यार्थी असलेला अभिषेक सिम्बॉयोसिस कॉलेजातील आपल्या मित्रासोबत कॉफी पिण्यासाठी जर्मन बेकरीत गेला होता.

close