जैतापूर प्रकल्पाविरोधात मच्छिमारांच्या आंदोलनाकडे सेनेची पाठ

December 12, 2015 3:20 PM0 commentsViews:

jaitapur4312 डिसेंबर : जैतापूर प्रकल्पाविरोधात जेल भरो आंदोलनाला मोर्चानं सुरुवात झालीये. या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेनेनं केली होती. आज प्रत्यक्षात मोर्चा निघाला पण एकही शिवसैनिक या मोर्चाकडे फिरकला सुद्धा नाही.

साखरी नाटेमधील सर्व मच्छीमार आणि महिलांनी एकत्र येत प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करत जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या भारत भेटीचा निषेध केलाय. मात्र, ज्या शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्या शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्चात कुठेच दिसून आले नाहीत. शिवसेनेचे आमदार राजन साळवी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचं समजतंय पण प्रकल्पाविरोधातला शिवसेनेचा एल्गार या मोर्चात तरी दिसून आलेला नाही.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close