बारावीचा अभ्यासक्रम देशभर समान

February 16, 2010 10:19 AM0 commentsViews: 4

16 फेब्रुवारी बारावीचा अभ्यासक्रम आता देशपातळीवर समान असणार आहे. 2013 पासून देशभरात 12 वीचा सायन्स आणि मॅथेमेटीक्सचा अभ्यासक्रम समान होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी आज याविषयीची घोषणा केली आहे. मेडिकल, इंजिनिअरींग आणि कॉर्मसच्या पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने सीईटी म्हणजेच कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या सीईटीची पूर्वतयारी म्हणूनच सायन्स, मॅथ्सच्या अभ्यासक्रमात समानता आणली जाणार आहे. या बदलांसाठी चर्चा करण्याकरिता सिब्बल यांनी आज दिल्लीत देशभरातल्या 20 शिक्षण बोर्डांच्या प्रतिनीधींची बैठक बोलावली होती. त्या बैठकीतल्या सहभागी प्रतिनीधींनीही या बदलांना सहमती दर्शवली आहे. बैठक संपल्यानंतर दिल्लीत सिब्बल यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

close