विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, चुरस वाढली

December 12, 2015 6:02 PM0 commentsViews:

vidhan bhavan312 डिसेंबर : विधान परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याची मुदत आज (शनिवार) संपली. नागपूर विधानपरिषदेची जागा वगळता इतर सर्व जागांवर चुरशीच्या लढती होणार असल्याचं आता चित्र स्पष्ट होतंय.

मुंबईतील 2 जागांसाठी 3 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये शिवसेनेकडून रामदास कदम तर काँग्रेसतर्फे भाई जगताप यांच्यात थेट लढत होणार आहे. अहमदनगर विधानपरिषदेच्या आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काँग्रेसचे जयंत ससाणे यांनी अर्ज माघारी न घेतल्यानं आता राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण जगताप यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसबरोबरच येथे शिवसेनेच्या शशिकांत गाडे यांच्याशी ही कडवी लढत राष्ट्रवादीला द्यावी लागणार आहे.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close