परवडणारी 10 लाख घरे

February 16, 2010 10:28 AM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी राज्यात सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी 10 लाख घरे उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. पुढील 4 वर्षात ही घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्यात 6 हजार कोटींची नगर उत्थान योजना राबवणार येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 1 एप्रिलपासून सर्व बांधकामांना वॉटर रिसायकलिंग, रेन हार्वेस्टिंग, सौर उर्जेची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

close