643 रन्सवर इनिंग घोषित

February 16, 2010 10:33 AM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारीकोलकाता टेस्टमध्ये भारतीय टीमने आपली पहिली इनिंग सहा विकेटवर 643 रन्सच्या विशाल स्कोअरवर घोषित केली आहे. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये टीमला 347 रन्सची आघाडीही मिळाली आहे. या इनिंगमध्ये भारतीय टीमतर्फे चौघा बॅट्समननी सेंच्युरी केली. सेहवाग , सचिन पाठोपाठ आज व्ही व्ही एस लक्ष्मण आणि कॅप्टन धोणीनेही सेंच्युरी झळकावली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 259 रन्सची नॉटआऊट पार्टनरशिप केली. लक्ष्मणने 143 तर धोणीने नॉटआऊट 132 रन्स केले. आजचा खेळ संपायला अर्धा तास असताना धोणीने मग इनिंग घोषित केली. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सना आज केवळ एक विकेट घेण्यात यश आले. अमित मिश्रा 28 रन्सवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकन टीमने आपली दुसरी इनिंग आता सुरु केली आहे.

close