पुण्यात शनिवारवाड्यावर भन्सालींचा पुतळा जाळला

December 12, 2015 8:45 PM0 commentsViews:

bhansali shanivar wada12 डिसेंबर : बाजीराव -मस्तानी या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा या मागणीसाठी पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा पुतळा दहन करून आंदोलन करण्यात आलं. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने हा आंदोलन करण्यात आला.

सध्या सोशल मीडियावर दीपिका पदुकोण,प्रियांका चोप्रा,आणि बाजीरावाच्या भुमिकेत असलेला रणवीर सिंग याचा बाजीराव मस्तानी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या चित्रपटात ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ हे गाणी चुकीच्या पद्धतीने दाखविली आहे. शिवाय बाजीराव यांना एका क्रुरतेच्या भूमिकेत दाखवून चुकीचा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातुन दाखवला गेलाय. त्यामुळे जेव्हा चित्रपट देशात आणि देशाबाहेर प्रदर्शित होईल तेव्हा बाजीराव आणि मस्तानी यांच्या बद्दलचे गैरसमज लोकांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे हा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा अशी मागणी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close