ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार ‘पद्यविभूषण’ने सन्मानित

December 13, 2015 9:18 PM0 commentsViews:

Dilip Kumar padmavibhushan

13 डिसेंबर : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज पद्यविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राजनाथ सिंह यांनी दिलीपकुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव केला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे मुंबईच अध्यक्ष आशिष शेलार, दिलीपकुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायराबानू आणि निकटवर्तीय यावेळी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करताना सायराबानू या भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close