मालाड मालवणीत पूल कोसळल्यामुळे 8 जखमी

December 14, 2015 8:37 AM0 commentsViews:

malvani14 डिसेंबर : मालाडच्या मालवणी भागात दुचाकी वाहने जाणारा कच्च्या पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले.

या पुलाखालून जाणार्‍या नाल्यात काही वाहनं पडून ती वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.

रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास या पुलाचा काही भाग कोसळला. मालाड मालवणी एव्हरशाईन येथे दुचाकी जाणारा कच्चा पुल आहे. रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास या पुलाचा काही भाग कोसळला. त्याचवेळी या पुलावरुन रहदारी सुरू असल्याने दुचाकीधारक आणि पादचारी अडकून पडले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close