दिलीप वळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर

December 14, 2015 8:59 AM0 commentsViews:

Image img_146292_dilipvalseonanna23562356.transfe_240x180.jpg14 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार दिलीप वळसे-पाटील यांची प्रकृती आता स्थिर आहे. भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कात्रज दूध डेअरीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान मंचावरच वळसे पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. तातडीने पाटील यांना अजित पवार यांनी भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केलं. वळसे पाटील यांची याआधी अँजिओप्लास्टी झाली आहे, त्यांचा पेसमेकर हलल्यामुळे पाटील यांना त्रास झाला. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढच्या उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close