आज अवकाशात खरी ‘आतषबाजी’, रात्री 9 ते 4 उल्कावर्षाव पाहण्याची पर्वणी

December 14, 2015 12:19 PM0 commentsViews:

ulka varsha_14 डिसेंबर : अवकाशातील घडामोडींबद्दल कुतुहल असलेल्या मंडळींना आज (सोमवारी) अनोखी पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. आकाशात होणारी आतषबाजी देशातील नागरिकांना आज अनुभवता येणार आहे. मिथुन तारका समुहातून रात्री 9 ते मध्यरात्री 4 वाजेपर्यंतच्या काळात उल्कावर्षाव होणार असल्याने तो अुभवण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळेल. या उल्कावर्षावाचा तीव्र बिंदू भारतीय वेळेप्रमाणे रात्री साडेअकराच्या सुमारास आहे. एका तासात सुमारे 70 उल्का मिथुन तारका समुहातील कॅस्टर या तार्‍याच्या दिशेकडून येताना दिसण्याची शक्यता आहे.

उल्का वर्षाव म्हणजे काय ?

एखादा धूमकेतू हा सूर्याची परिक्रमा करत असताना काही वेळेस सूर्याजवळून जातो. त्यावेळी त्याच्या काही भागाचे तुकडे होतात. हे
तुटलेले बारीक तुकडे किंवा कण धूमकेतूसारखेच सूर्याची परिक्रमा करत असतात. पृथ्वीची कक्षा या धूमकेतूच्या कक्षेस छेदते. पृथ्वी ज्यावेळी त्या छेदबिंदूवर येते, तेव्हा या कणांचा पृथ्वीवर मारा होतो. त्यावेळी उल्का वर्षाव दिसून येते. ज्या तारका समूहातून अशा उल्कावर्षाव होताना दिसतो, त्या तारकासमूहाच्या नावाने तो उल्का वर्षाव ओळखण्यात येतो. रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंत तुम्हाला उल्कावर्षाव उघड्या डोळ्याने पाहता येईल. त्यानंतर मध्यरात्री ते 3- 4 वाजेपर्यंत पश्चिम क्षितिजावर सुमारे 45 अंशावर या उल्का दिसू शकतात. हा वर्षाव भारतातून खूप चांगला दिसण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close