रोहित शर्मा ‘क्लिन बोल्ड’,अडकला लग्नबेडीत

December 14, 2015 12:38 PM0 commentsViews:

भारताचा स्टार बॅट्समन रोहित शर्माचा त्याची मैत्रीण रितिका सजदेहशी विवाह झालाय. मुंबईतल्या वांद्रे येथील ताज लँण्ड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. यावर्षी आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 28 एप्रिलला रोहितने त्याची मैत्रीण रितिका हिला लग्नाची मागणी घातली होती. रोहितच्या लग्नसोहळ्यासाठी डिझायनर कपड्यांपासून सार्‍या गोष्टींची तयारी आधीपासूनच झाली होती. या लग्नाला क्रिकेटर सुरेश रैना, सचिन तेंडुलकर आवर्जून उपस्थित होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close