21 जवानांनी गमावले प्राण

February 16, 2010 11:41 AM0 commentsViews: 1

16 फेब्रुवारीपश्चिम बंगालमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्यात 21 जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जवान बेपत्ता आहेत. सोमवारी संध्याकाळी झालेला हा हल्ला पश्चिम बंगालमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. पश्चिम मिदनापूर जिल्हातील सिल्धा परिसरात संयुक्त सुरक्षा दलाच्या छावणीवर सुमारे 80 नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी छावणीत 50 जवान होते. नक्षलवाद्यांनी या जवानांना अक्षरश: जिवंत जाळले. हा हल्ला सुरु असताना जवळच्या धर्मपूर येथील CRPF च्या कॅम्पवरही नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. माओवादी नेता किशनजी याने या हल्याची जबाबदारी घेतली आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या ऑपरेशन ग्रीन हन्टला दिलेले उत्तर असल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे.

close