पिंपरी चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची आत्महत्या

December 14, 2015 1:17 PM0 commentsViews:

suicide img14 डिसेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. तपस्या भास्कर असं आत्महत्या करणार्‍या तरुणीचं नाव आहे. तपस्या ही मुळची जयपुरची रहिवासी होती. तीने आत्महत्या का केली याबद्दल पोलीस तपास करत आहे.

 तपस्या भास्कर ही हिंजवडीतील पर्सिस्टन्स या नामांकित आयटी सॉफ्टवेअर कंपनीत अभियंतापदी कार्यरत होती. शहरातील जगताप डेअरी परिसरात असलेल्या बोरा हैपी होम सोसायटीमध्ये एका भाड्याच्या खोलीत ती एकटीच राहायची. रविवारी तपस्या तिच्या घरमालकांना दर महिना ठरलेलं घरभाडं देणार होती, त्यानुसार घरमालक तिच्याकडे भाडं मागण्यांसाठी गेले. मात्र, बराच प्रयत्न करून ही तपस्या दार उघडत नसल्याने पोलिसांना बोलवण्यातत आलं आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

तपस्याच्या मृतदेहावरील नाका तोंडाजवळ जखमा होत्या आणि रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळतीये. तपस्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मात्र ज्या परिस्थिती तपस्याचा मृतदेह आढ़ळला त्यानुसार तपस्याने आत्महत्या केली आहे की तिची हत्या करण्यात आली असा संशय निर्माण झालाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close