नारळीकर दाम्पत्याचा सन्मान

December 14, 2015 2:23 PM0 commentsViews:

14 डिसेंबर : सातारा नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ .नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांना देण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्काराचं तिसरं वर्ष असून पहिल्या वर्षी डॉ.अभय बंग दाम्पत्याला तर दुसर्‍या वर्षी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना देण्यात आला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close