सेक्स स्कँडलविरोधात मोर्चा

February 16, 2010 12:40 PM0 commentsViews: 7

16 फेब्रुवारीठाणे जिल्ह्यातील जव्हार इथले सेक्स स्कँडल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज जव्हारमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले.'आयबीएन-लोकमत'ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर जव्हारमध्ये संतापाची लाट उसळली होती. जव्हारमधील हॉटेल्समध्ये चित्रित केलेल्या आदिवासी महिला आणि मुलींच्या ब्ल्यू फिल्मस् बाजारात विकल्या जात होत्या. याप्रकरणी झाकीर शेख, रियाझ शेख आणि गिरीश चांदवानी या आरोपींना अटक झाली आहे. मात्र हॉटेल मालकांना राजकीय दबावामुळे अटक होत नाही, असा आरोप मोर्चकर्‍यांनी केला. हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. तिथे आमदार चिंतामण वनगा, राजेंद्र गावित आणि विष्णू चवरे यांनी निवेदन दिले. त्यानंतर संतप्त मोर्चेकर्‍यांनी परतताना हॉटेल राजमहालची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

close