‘स्मार्ट’ शिवसेना, मुंबईत विरोध तर पुण्यात पाठिंबा !

December 14, 2015 3:25 PM0 commentsViews:

uddhav thackarey tuljapur14 डिसेंबर : स्मार्ट सिटी म्हणजे मुंबईच्या ‘माथी’ नवे ‘अंडरवर्ल्ड’ म्हणजे समांतर सरकारच मारण्याचा हा प्रकार आहे अशी टीका करणार्‍या शिवसेनेचा दुटप्पीपणा आता समोर आलाय. मुंबईत स्मार्टसिटीला कडाडून विरोध करण्यात आलाय तर पुण्यात मात्र पाठिंबा दर्शवण्यात आलाय.

सरकारने स्मार्टसिटीचा प्रस्ताव 15 डिसेंबर पूर्वी मंजूर करावा यासाठी दिलेल्या आदेशानुसार पुण्यात आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय. पुण्याचे आयुक्त प्रस्तावाच सादरीकरण करणार आहेत. मनसे आणि काँग्रेसने स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याला विरोध केलाय. उपसूचनांसह प्रस्ताव मंजूर केला तरच पाठिंबा देणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतलीय. तर दुसरीकडे हा प्रस्ताव मंजून व्हावा यासाठी भाजपने महाआरती केली.

शिवसेनेनं मात्र, आश्चर्यकारकरित्या या स्मार्टसिटी योजनेला चक्क पाठिंबा दिर्शवलाय. गंम्मत म्हणजे याच शिवसेनेनं मुंबईत मात्र, स्मार्टसिटी योजनेला कडाडून विरोध केलाय. स्मार्ट सिटीनामक जो काही आराखडा समोर आणला जातोय तो भांडवलदार, व्यापारी व बिल्डरधार्जिणा आहे हे आम्ही मुंबईच्या बाबतीत तरी ठामपणे सांगू शकतो. या स्मार्ट सिटीत मुंबईतला सामान्य माणूस, भूमिपुत्र नसेल तर आग लावा तुमच्या त्या विकासाला ? अशी टीका शिवसेनेनं आपलं मुखपत्र सामनामधून केलीये.

एवढंच नाहीतर असा डाव कुणी रचत असेल तर शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार त्यांनी पाहून घ्यावी. मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे आणि मुंबईतल्या 105 हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारून यावे. म्हणजे आम्हाला काय सांगायचे आहे ते कळेल असा इशाराही दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close