नशिबाचा खेळ, कारखाली येऊन सुद्धा ‘ती’ सुखरूप

December 14, 2015 3:46 PM0 commentsViews:

 
14 डिसेंबर : ‘देव तारी त्याला कोण मारी’ असं उगाच म्हटलं जात नाही. चीनमध्ये एक असा अपघात घडला ज्यावर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही. या अपघातात एक तरुणी चमत्कारीकरित्या सुखरूप वाचली.chaina aacident3

घडलेली हकीकत अशी की, एका चौकात एक तरुणी सायकल वरून जात असताना एका कारने धडक दिली. काही कळायच्या आताच ती कारच्या खाली चिरडली गेली. पण, या तरुणीचं नशीब बलवंत्तर म्हणावं, कार खाली येऊन सुद्धा तिला फक्त किरकोळ दुखापत झालीये. ही तरुणी जेव्हा कारखाली दबली गेली तेव्हा तिथे उपस्थिती जवळपास 20 हून अधिक लोकांनी तीला वाचवण्यासाठी कारच उचलून बाजूला केली. अवघ्या काही मिनिटांतच तीने स्वत:ला सावरत सुखरूप बाहेर आली. तीला सुखरूप पाहुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणतात ना खेळ कुणाला देवाचा कळाला…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close